तलवारी - चाकू घेऊन फिरणे, महिलांना त्रास विशेष पोलीस
महानिरीक्षक कार्यालयात लेखी तक्रार
महानिरीक्षक कार्यालयात लेखी तक्रार
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील विटावा गावात गुंडागर्दी, तलवारी चाकू घेऊन फिरणे, महिलांना त्रास देणे, धमक्या देणे आणि लूटमार अशा घटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब वाल्मीक नरोडे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. बाळासाहेब वाल्मीक नरोडे यांच्या तक्रारीनुसार, गावातील इसम पवन संजय पोटफाडे, गौरव बाळासाहेब नरोडे, वर्षा बाळासाहेब नरोडे, ओम अंकुश व इतर १८ व्यक्ती यांचेसह हे गुंडागर्दी करून गावामध्ये आराजकता माजवली.
विटावा गावकऱ्यांना धमकावणे आणि डिक्कीतून तब्बल ६७ हजारांची रक्कम लंपास :
यावेळी झालेल्या मारहाणीत बाळासाहेब वाल्मीक नरोडे गंभीर जखमी झाले असून, त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांची पत्नी व मुलगा गौरव यांची पवन पोटफाडे याला साथ असून त्यांनी त्यांना घराबाहेर काढले असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
गावात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आरोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब नरोडे यांनी केली आहे. निष्पाप नागरिकांवर हल्ले करणे, असे प्रकार सतत घडत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.